पाकिस्तानला 48 अत्याधुनिक ड्रोन देण्याचा चीनचा निर्णय 

भारतापुढे नवे आव्हान 

बिजींग: चीनने पाकिस्तानला 48 आधुनिक लष्करी वापराची ड्रोन विमाने देण्याचा निर्णय घेतला आहे. लष्करी वापराची ही विमाने मानवरहित आहेत आणि ती कोणत्याहीं ऋतुत वापरता येण्यासारखी आहेत. 48 तयार ड्रोन पाकिस्तानला दिल्यानंतर चीनच्या मदतीने पाकिस्तानातच या ड्रोनची निर्मीती करण्यासही चीनने सहयोग देण्याचे ठरवले आहे. पाकिस्तानला मिळणाऱ्या या ड्रोन मुळे भारतापुढे एक नवीन आव्हानात्मक स्थिती निर्माण होणार आहे. 

-Ads-

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारत भेटीवर होते त्यावेळी त्यांनी भारताला एस 400 क्षेपणास्त्रे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पाठोपाठ चीन आणि पाकिस्तानमध्ये हा करार झाला आहे. त्यामुळे त्या कराराला विशेष महत्व दिले जात आहे. चीनकडून आम्हाला ही ड्रोन्स मिळणार असल्याची माहिती पाकिस्तातनच्या हवाईदलाने आपल्या फेसबुक अकाऊंटवर दिली आहे. चीनची चेंगडू एअरक्राफ्ट इंडस्ट्रीयल कंपनी पाकिस्तानच्या कामरा येथील एरोनॉटिक्‍स कॉम्पलेक्‍स मध्ये संयुक्तरित्या ही ड्रोन निर्मीतीही सुरू करणार आहे. विंग लूंग 2 असे या मानवरहित ड्रोन विमानाचे नाव आहे. त्यामुळे सीमा भागात टेहळणी करणे, हवेतून क्षेपणास्त्र डागणे ही कामे होऊ सहज होऊ शकतात. तथापी या डोन्सची क्षेपणास्त्र वाहण्याची क्षमता किती आहे याची माहिती मात्र चीनकडून देण्यात आलेली नाही. चीनच्या या ड्रोन्सना आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. गेल्या फेबुवारीमध्ये चीनने या ड्रोनची चाचणी घेतली होती. त्यानंतर त्यांनी त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केले आहे. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)