चीनने आताच व्यापारी करार करावा – ट्रम्प यांच्याकडून दबावतंत्राचा अवलंब

वॉशिंग्टन – चीनने आपल्या व्यापारी करार आताच पूर्ण करावा. अन्यथा आपल्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कालावधीत हा करार करणे खूपच अवघड असेल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला दिला आहे. अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये सध्या जोरदार व्यापार युद्ध सुरु आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांच्या उत्पादनांवर वाढीव आयात शुल्क लादले जात आहे. त्यामुळे व्यापारी संबंध ताणले गेले आहेत. हे युद्ध संपविण्यासाठी दोन्ही देशादरम्यान अनेक चर्चा झाल्या. श्‌ुक्रवारी झालेली चर्चा ही कराराशिवायच पूर्ण झाली. दरम्यान, पुढील चर्चा बीजिंगमध्ये होणार असल्याचे चीनच्या व्यापारी शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी सांगितले.

शनिवारी ट्रम्प यांनी एका ट्‌वीटमध्ये म्हणाले, की चीनला अलीकडे झालेल्या चर्चेत मोठा झटका मिळाला आहे. त्यामुळे ते पुढच्या निवडणुकीपर्यंत वाट पाहू इच्छित आहेत. कारण 2020 मध्ये एखादा डेमोक्रेटिक पक्षाचा उमेदवार राष्ट्रपती बनला तर अमेरिकेला दरवर्षी 500 अरब डॉलर्सना लुटता येईल, असे त्यांना वाटत आहे. परंतु, पुन्हा मीच जिंकून येणार, ही त्यांची अडचण आहे. अमेरिकेच्या इतिहासात अर्थव्यवस्था व रोजगार स्थिती अत्यंत चांगली राहिली आहे. जर माझ्या दुसऱ्या टप्प्यात चीनसोबत चर्चा झाल्यास तेव्हा चीनला करार करणे कठीण जाईल. त्यामुळे त्यांनी आताच करार करणे त्यांच्यासाठी हिताचे राहिल, असे ते म्हणाले.

अमेरिकेने चीनच्या 200 अब्ज डॉलर्स किंमतीच्या वस्तूंवरचा आयात कर 10 टक्कयांवरून 25 टक्के केला होता. हे कर शुक्रवारपासून लागू झाले. त्यानंतर ट्रम्प यांनी चीनच्या सर्व म्हणजे 300 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंवर आयात कर वाढवण्याचा इशारा दिला आहे. पण ही वाढ लगेच लागू केली जाणार नाही, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)