भारताचा स्थानिक चलनात व्यापाराचा प्रस्ताव चीनला अमान्य

नवी दिल्ली: स्थानिक चलनात परस्पर व्यापार करण्याचा भारताचा प्रस्ताव चीनने अमान्य केला आहे. चीनबरोबरच्या व्यापारातील तूट कमी करण्यासाठी भारताने स्थानिक चलनातील व्यापाराचा प्रस्ताव चीनसमोर मांडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सन 2017-18 मध्ये भारताने चीनला 13.4 अब्ज डॉलर्सचा माल चीनला निर्यात केला. याच कालावधीत 76.4 अब्ज डॉलर्सच्या मालाची चीनकडून आयात केली. म्हणजे चीनबरोबरोबरच्या व्यापारात सन 2017-18 मध्ये भारताला 63 अब्ज डॉलर्सचा तोटा झाला. सन 2016-17 मध्ये 51.11 अब्ज डॉलर्सचा तोटा झाला होता. ही तूट कमी करण्याच्या उद्देशानेच भारताचेयुआन-रुपयांत व्यापाराचा प्रस्ताव मांडला होता.

भारताने रशिया, इराण आणि व्हेन्झुएला या देशांसमोरही स्थानिक चलनात व्यापाराचा प्रस्ताव मांडला आहे. या देशांबरोबरचा भारताचा व्यापारही तोट्यात आहे. भारताने स्थानिक चलनात निर्यातीला उत्तेजन दिले पाहिजे, असे एफआयईओ (फेडरेशन ऑफ इंडियन एक्‍स्पोर्ट) चे अध्यक्ष गणेश कुमार गुप्ता यांनी म्हटले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)