वाघ-गेंड्याच्या अवयवांच्या औषधी वापरावरील बंदी चीनने उठवली 

बीजिंग – वाघ-गेंड्यांच्या अवयवांच्या औषधी वापरावरील बंदी चीनने उठवली आहे. आता वाघ आणि गेंडा या प्राण्यांच्या अवयवांचा संशोधन आणि औषधी उपयोगासाठी सर्रास वापर करता येणार आहे. वाघ आणि गेंड्यांच्या अवयवांच्या औषधासाठी वापरावर चीन सरकारने 1993 साली बंदी घातली होती. ती अद्यापपर्यंत लागू होती.
मात्र या आदेशानंतर यापुढे गेंडे आणि वाघांच्या अवयवांचा औषधासाठी उपयोग करता येईल हे चीनच्या राज्य परिषदेने स्पष्ट केले आहे.

त्याचबरोबर या प्राण्यांच्या अवयवांच्या अवैध व्यापारावरील बंदी कायम ठेवण्यात आली असल्याचे आणि तिचे उल्लंघन करणारांस कठोर शासन करण्यात येईल हे देखील स्पष्ट केले आहे. बंदी उठवण्याच्या या निर्णयाचा वन्यप्राणी कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला आहे. डब्ल्यूडब्ल्यूएफ (वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड) या संस्थेने चीनला बंदी उठवण्याचा हा आदेश मागे घेण्याची विनंती केली आहे.

चीनच्या परंपरागत चिकित्सा प्रणालीत गेंडा आणि वाघासह अनेक वन्य प्राण्यांच्या अवयवांचा मोठ्या प्रमाणावर औषधासाठी वापर केला जातो. मात्र वाघाच्या शरीराच्या कोणत्याही भागाचा कोणत्याही प्रकारे औषधी उपयोग नाही, ही गोष्ट चायनीज मेडिसिन सोसायटीने जाहीर केली आहे,


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)