तिबेट मधील सैन्यांकडे चीनने दिली अधिक आधुनिक शस्त्रे

बिजींग: तिबेटमध्ये तैनात असलेल्या लष्करी जवानांकडे चीनने आधिक आधुनिक शस्त्रास्त्र सुविधा पुरवल्या असून तोफा लावलेले रणगाडे तेथील लष्कराकडे पाठवण्यात आले आहेत त्यामुळे या भागातील नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तेथील लष्कराकडे 50 ते 100 किमी अंतरावर मारा करू शकण्याची क्षमता असलेल्या तोफाही सोपवण्यात आल्या आहेत.

तिबेटच्या पठारावरून सीमा भागातील उंच पर्वतराजीवरील ठिकाणांवर हल्ला करण्याची क्षमता तेथील चिनी लष्करामध्ये याद्वारे निर्माण झाली आहे. सीमा भागातील उंच पर्वतराजीवरील सुरक्षेसाठीच ही शस्त्रसज्जता ठेवण्यात आल्याचे पिपल्स लिबरेशन आर्मीच्यावतीने सांगण्यात आले आहे.

गेल्याच आठवड्यात चीनेचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या लष्कराला युद्ध सज्ज राहण्याचा आदेश दिला होता त्याच पार्श्‍वभूमीवर हीं तिबेट मध्ये ही शस्त्रसज्जता ठेवण्यात आली असावी असे मानले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)