अरूणाचलातील पुराबाबत चीनची भारताला सूचना 

नवी दिल्ली – तिबेट मध्ये दरडी कोसळण्याच्या झालेल्या दुर्घटनांमुळे ब्रम्हपुत्रा नदीला अचानक पुर आल्याची स्थिती उद्‌भवू शकते त्यातून अरूणाचल प्रदेशला धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा चीनने भारताला दिला आहे. अरूणाचलाबाबत चीनने भारताला अशी इशारा दर्शक माहिती देण्याची गेल्या पंधरा दिवसातील दुसरी वेळ आहे.

चीनने भारताच्या जलस्त्रोत मंत्रालयाला कळवले आहे की दरडी कोसळण्याच्या घटनेमुळे तिबेट मध्ये ब्रम्हपुत्रा नदीचा प्रवाह खंडीत झाला असून तेथे कृत्रिम तळे निर्माण झाले आहे त्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठी जमला आहे. तो अरूणाचलप्रदेशसाठी धोक्‍याची ठरू शकतो आणि तेथे अचानक पूरस्थिती निर्माण होऊ शकते. अशाच प्रकारची सुचना चीनने भारताला 17 ऑक्‍टोबर रोजी दिली होती.

या कृत्रिम तळाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू शकते आणि ते अरूणाचलप्रदेशातील ब्रम्हपुत्रेच्या काठावरील भागात पूरस्थिती निर्माण करू शकते असे चीनेने भारताला कळवले असून त्यानुसार योग्य ती उपाययोजना केली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)