चीनने नौदल व हवाई दलाचे सामर्थ्य वाढवले-पायदळ केले निम्मे!

बीजिंग (चीन) : आपल्या रणनीतीत बदल करत चीन आपल्या हवाई दलाचे आणि नौदलाचे सामर्थ्य वाढवत आहे. त्यासाठी पायदळात मोठी कपात करत चीनने ते निम्म्यावर आणले आहे. मात्र तरीही 20 लाख जवान असलेले चीनचे लष्कर आज जगात सर्वात मोठे लष्कर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पीएलए (पीपल्स लिबरेशन आर्मी) च्या इतिहासात आजवर न झालेले असाधारण बदल घडत आहेत. चीनने युद्धापासून दूर असणाऱ्या दलात मोठी कपात केली आहे, आणि अधिकाऱ्यांच्या संख्येत 30 टक्के कपात केली आहे. अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या धोरणानुसार गेल्या काही वर्षात लष्कर तीन लाखाने कमी केले आहे. आणि हवाई दल, नौदल, रॉकेट दल आणि सायबर शस्त्रांसाठी जबाबदार स्ट्रॅटिजिक सपोर्ट फोर्स वाढवून एकूण लष्कराची संख्या मात्र जवळपास निम्मी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चीनच्या नौदलात सध्या एक विमानवाहू जहाज आहे. दुसऱ्या विमानवाहू जहाजाचे परीक्षण चाललेले आहे आणि तिसऱ्या विमानवाहू जहाजाची बांधणी चालू आहे. आपल्या नौदलात चीन पाच ते सहा विमानवाहू जहाजे तैनात करणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)