#AirStrike : भारतीय हवाई दलाच्या कारवाईनंतर चीननं दिली ‘ही’ प्रतिक्रिया

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाकडून आज पाकव्याप्त काश्मिरातील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण केंद्रावर हवाई हल्ला करत जवळपास ३०० दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे. यामध्ये अझर मसूदचा मोठा भाऊ अझहर खान देखील ठार झाला आहे.

भारतीय वायुसेनेच्या कारवाईनंतर पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीने इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक आयोजित केली. या बैठकीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सशस्त्र सेना, नागरिकांना “सर्व प्रकारच्या परिस्थितीसाठी सज्ज” राहण्याचे सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकनंतर चीननं यावर प्रतिक्रिया दिली आहे. चीननं म्हटलं आहे की, पाकिस्तान आणि भारत हे दक्षिण आशियातील महत्त्वाचे देश आहेत. त्यामुळे दोघांनी संयम बाळगावा आणि शांतपणे प्रश्न सोडवावेत. आम्ही आशा करतो की दोन्ही देश दक्षिण आशियामध्ये शांतता राखण्यासाठी प्रयत्न करतील.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)