ज्युहाई एयर शोमध्ये चीनने केले खतरनाक लेजर शस्त्रप्रणालीचे प्रदर्शन 

बीजिंग (चीन) – ज्युहाई एयर शोमध्ये चीनने खतरनाक लेजर शस्त्रप्रणालीचे प्रदर्शन केले आहे. दक्षिण चीनमधील गुआंगदोंग प्रांतातील ज्युहाई शहरात चीनने नवीन लेजर संरक्षण प्रणाली एलडब्ल्यू 30 चे प्रदर्शन आयोजित केले होते. ड्रोन्स, डागलेले बॉंब आणि मॉर्टर्स हवेतच नष्ट करण्याची क्षमता या लेजर संरक्षण प्रणालीमध्ये आहे. जगावर जरब बसवण्याचच्या हेतूने चीन सतत नवनवीन शोध लावत असतो आणि त्यांचे प्रदर्शनही करत असतो.

एलडब्ल्यू 30 ची निर्मिती सीएएसआयसी (चीन एरोस्पेस सायन्स इंडस्ट्री कॉर्पोरेशन) ने केली आहे. सप्टेंबर 2017 पासून आजपर्यंत किमान वीस वेऴा अमेरिकन विमानांवर लेझर हल्ले करण्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती देताना अमेरिकेच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे, की या लेजर हल्ल्यांमागे चीनचाच हात असण्याची शक्‍यता जास्त आहे. पॅसेफिक क्षेत्रात झालेले हे लेजर हल्ले चिनी लष्कराचे होते की अन्य हे निश्‍चितपणे सांगता येत नसले, तरी वैमानिकांसाठी हानिकारक होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)