“बच्चे मन के सच्चे’ 

धनंजय मुंडे यांचा अमित शहांना उपरोधिक टोला

मुंबई – भाजप अध्यक्ष अमित शहा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी अमित शहांनी कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी अमित शहा आणि त्यांच्या नातीमध्ये घडलेला प्रसंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही ट्‌विट करत “बच्चे मन के सच्चे’ असे म्हणत उपरोधिक टोला लगाविला आहे.

त्याचे झाले असे की, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज (30 मार्च) गांधीनगर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला. त्यापूर्वी अमित शहा यांनी कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी अमित शहा यांनी आपल्या नातीला जवळ घेतले. त्यावेळी तिने पांढरी टोपी घातली होती. शहा आजोबांनी तिची पांढरी टोपी काढून भाजपची टोपी घालण्याचा प्रयत्न केला. पण नातीने ती टोपी घालण्यास नकार दिला आणि परत आपली पांढरी टोपी घातली. आजोबा अमित शहा आणि त्यांच्या नातीमधील हा प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही हा व्हिडीओ ट्विट केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)