एअर स्ट्राईक साठी बालकोटचीच निवड केली कारण…

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाने जैश-ए-मोहम्मदच्या बालाकोट परिसरातील तळांवर एअर स्ट्राईक केली. मात्र हवाई दलाने या हल्ल्‌यासाठी खैबर पख्तुनवालामधील बालाकोट या जागेचीच निवड का केली असा प्रश्‍न सर्वांना असून. या एअर स्ट्राईक साथी भारताने या प्रांताची अत्यंत विचारपुर्वक निवड केली असून हा प्रदेश अमेरिकेच्याही रडारवर आहे. कारण हा प्रदेश अत्यंत दुर्गम असून याला दहशतवाद्यांचा गडही मानला जातो.

बालाकोट हे शहर हिमालयातील पर्वतरांगांमध्ये वसलेले असून भारताच्या सीमेपासून हे शहर केवळ 100 किमी अंतरावर आहे. त्याच बरोबर येथील पर्वतरांगांमुळे हा प्रदेश अत्यंत दुर्गम असून दहशतवाद्यांसाठी अत्यंत मोक्‍याच्या ठिकाणी आहे. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्म्द आणि हिज्बुल मुजाहिद्दीनचे दहशतवाद्यांच्या कंट्रोल रुम्स या भागात आहेत.
1989मध्ये काश्‍मीरमध्ये बंड झाले. या बंडानंतर हा प्रदेश दहशतवाद्यांचा ट्रेनिंग कॅम्प बनला. दहशतवाद्यांसाठी महिनाभराचे ट्रेनिंग कॅम्प इथे आयोजित केले जातात. जैश-ए-मुहम्मदचे अनेक हस्तक याच प्रदेशात वावरत असतात. या सर्व कारणांचा विचार करूच या भागाची निवड भारतीय हवाई दलाने केली गेली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)