खासदार संजय काकडेंचे मन वळविण्यात मुख्यमंत्री यशस्वी

मुंबई – पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार यांचे मन वळविण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले आहे. खासदार संजय काकडे हे पुण्यातून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून चालू होती. त्यामुळे या चर्चेला आता पूर्ण विराम मिळाला आहे.

देवेंद्र फडणवीस आणि सुभाष देशमुख अनेक दिवसांपासून संजय काकडेंची मनधरणी करत असल्याचे चित्र होते. अखेर त्यात यश आले असून पश्चिम महाराष्ट्राची मोठी जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले संजय काकडे यांना कांग्रेसमध्ये जाण्यापासून रोखण्यात यश आल्याने गिरीश बापट आणि संजय काकडे यांच्यात तह झाल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)