दत्तक घ्यायला मनगटात ताकद लागते, मुख्यमंत्र्यांचे पवारांना उत्तर

नगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष्य शरद पवार यांनी “आपल्याला दत्तक बापावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही, अशी जोरदार टीका मुख्यमंत्र्यांवर केली होती. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उत्तर दिले आहे. “मी दत्तक शब्द उच्चारला की अनेकांच्या पोटात दुखते. दत्तक घ्यायला मनगटात ताकद लागते. ४ वर्षातील माझे काम आणि १५ वर्षांचे तुमचे काम, होऊन जाऊ द्या, एकदा तुलना, असे आहवाहन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

अहमदनगरमध्ये महापालिका निवडणुकीसाठी भाजपाच्या दणदणीत प्रचारसभेला मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस संबोधित करीत होते. दरम्यान, राज्यातील मंत्री श्री राम शिंदे, खा. दिलीप गांधी उपस्थित होते.

-Ads-

दत्तक बापाच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही, स्वकष्टाने चालवतो -शरद पवार

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)