सूक्ष्म सिंचन योजनेची साखर कारखाने व बँकांनी अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई: ऊस पिकाखालील क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सूक्ष्म सिंचन योजनेची साखर कारखाने व बँकांनी प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

जे साखर कारखाने सूक्ष्म सिंचन योजनेची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांचे वीज खरेदी करारनामे रोखण्यात येतील. तसेच ज्या बँका या योजनेची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

सोलापूर, सांगली, अहमदनगर, पुणे व अन्य जिल्हा बँकांना राज्य सहकारी बँक या उसासाठीच्या सूक्ष्म सिंचन योजनेसाठी कर्ज उपलब्ध करुन देणार आहेत. ज्या शेतकऱ्यांचे व साखर कारखान्याचे कर्जासाठी अर्ज आले आहेत त्यांना तत्काळ मंजुरी देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)