मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; संभाव्य अनुचित घटना टळली

संग्रहित छायाचित्र

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरसोबत अनुचित प्रकार होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. आज सातारा येथे जाण्यासाठी निघालेल्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणापूर्वीच तांत्रिक बिघाड झाला. पायलटच्या ही बाब वेळीच लक्षात आल्याने पुढील अनुचित घटना टळली. बिघाडामुळे फडणवीस यांच्या नियोजित सातारा दौऱ्याला दोन तास विलंब झाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यभरातील हवाई प्रवासासाठी ऍलॉफ्ट आणि अडोनी या दोन एजन्सीमार्फत विमान व हेलिकॉप्टर सेवा पुरविली जाते. सातारा जिल्ह्यातील नायगाव (ता. खंडाळा) येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास अभिवादन करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज नियोजित कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांच्या प्रवास दौऱ्यासाठी ऍलॉफ्ट या एजन्सीने हेलिकॉप्टरची व्यवस्था केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विलेपार्ले येथील पवनहंस हेलिपॅडवरून हे हेलिकॉप्टर महालक्ष्मी येथील रेसकोर्स मैदानावर उतरणार होते व तेथून मुख्यमंत्री साताऱ्याला रवाना होणार होते. परंतु, पवनहंस हेलिपॅडवरून उड्डाण करण्यापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. दोन तास विलंब झाल्याने तोपर्यंत जिल्ह्यातील नेत्यांना त्यांची वाट पाहावी लागली. अखेर ऍलॉफ्ट एजन्सीने दुसऱ्या हेलिकॉप्टरची व्यवस्था केल्यानंतर मुख्यमंत्री साताऱ्याकडे रवाना झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)