मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीच लोकांना ठोक दो संस्कृती शिकवली : अखिलेश

लखनौ: उत्तर प्रदेशात जमावाकडून पोलीस कर्मचाऱ्याची हत्या होण्याचा दुसरा प्रकार कालच घडला असून यामुळे विरोधकांना योगी सरकारच्या विरोधात आवाज उठवण्याचा पुन्हा संधी मिळाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीच लोकांना ठोक दो संस्कृती शिकवली. त्याचाच हा परिणाम राज्यात दिसत असून या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नावाची चीजच अस्तित्वात राहिलेली नाही, अशी टीका समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या बंदोबस्तावरून परतणारे पोलीस कॉन्स्टेबल सुरेश वत्स यांची काल जमावाने बेदम मारहाण करून हत्या केली. त्या प्रकरणावर भाष्य करताना अखिलेश यादव यांनी ही टीका केली.3 डिसेंबर रोजी सुबोधकुमार सिंह नावाच्या पोलीस निरीक्षकाचीही बुलंदशहरमध्ये हत्या करण्यात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हा सारा योगी आदित्यनाथ यांच्या ठोक दो या नीतीचाच परिणाम आहे, असे त्यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत आता सामान्य लोक सोडाच पोलीसच सुरक्षित राहिलेले नाहीत, अशी टीका कॉंग्रेसचे प्रवक्‍ते रणदीप सुर्जेवाला यांनी केली आहे. त्यांनी या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. मायावती यांनीही या विषयावरून योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)