सातारा: आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उदयनराजेंना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून उतरविण्यात येणार असल्याच्या वृत्ताबाबत उदयनराजेंनी मिश्किल उत्तर दिले. ते म्हणाले, “”15 वर्षापुर्वी केंद्रात आणि राज्यात सत्ता होती. मला मुख्यमंत्री करायचे असते तर त्याच वेळी केले असते.
तसेही मुख्यमंत्री होऊन एका दालनात अडकून बसण्याची आपली इच्छा नाही.” मात्र, कास पठारावर मुख्यमंत्री कार्यालय स्थापन करणार असतील तर आपल्याला निश्चितपणे मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे दिलखुलास उत्तर उदयनराजे यांनी दिले.