लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात मुख्यमंत्र्यांची प्रचारधुमाळी,घेणार 98 सभा!

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचारधुमाळी सुरु झाली असून लोकसभेच्या 48 जागा असलेल्या महाराष्ट्रात पंतप्रधान मोदी देखील 8 सभा घेणार आहेत. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 48 मतदारसंघात प्रत्येकी दोन सभा मुख्यमंत्री फडणवीस घेणार आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील प्रचाराची मुख्य जबाबदारी मुख्यमंत्र्यांवरच असल्यामुळे निवडणुकीच्या काळात फडणवीस संपूर्ण राज्यभरात दौऱ्यावर असणार आहे. राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात दोन सभा घेणार आहे. येत्या महिन्याभरात मुख्यमंत्री साधारणत: 98 सभा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी काही सभा एकत्र घेतल्या होत्या. मात्र यापुढे दोन्ही नेते स्वतंत्र सभा घेणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)