नाणारच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी गोलगोल उत्तर दिले- जयंत पाटील

नागपूर: नाणार प्रकल्पावरून राजकारण चांगलेच पेटले आहे. या प्रकल्पावरून मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला स्पष्ट उत्तर द्यावे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. “नाणार रद्द झालाच पाहिजे, नाणार जाणार…’ अशा शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजी करीत सभागृहाचे कामकाज काल रोखून धरले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, नाणारच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी गोलगोल उत्तर दिले आहे. त्यांनी सभागृहाला स्पष्ट उत्तर द्यावे. आ. सुनील प्रभू यांनी ३२ (एक) ची अधिसूचना रद्द करण्याची मागणी केली आहे. शिवसेना या मुद्द्यावर सरकारविरोधात आहे. नाणारच्या मुद्द्यावर राज्य सरकार अल्पमतात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)