मुख्यमंत्री राज्याचे नव्हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ; अशोक चव्हाणांची उपरोधिक टिका

राज्याच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्र्यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाच्या तपासावरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ताशेरे ओढल्यानंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच न्यायालयाने मुख्यमंत्र्यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. महाराष्ट्राकरीता ही लाजिरवाणी बाब असून मुख्यमंत्री हे राज्याचे नसून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत, अशी उपरोधिक टिका करतानाच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

उच्च न्यायालयाने बुधवारी दाभोलकर व पानसरे हत्याकांड सुनावणीदरम्यान हत्येच्या तपास गती बाबत नाराजी व्यक्त करत गृहखात्यासह 11 खाती स्वत:कडे ठेवणारे मुख्यमंत्री फडणवीस एवढे व्यग्र आहेत कि त्यांना अशा प्रकरणांच्या तपासाकडे लक्ष द्यायला वेळ नाही? ते राज्याचे नेते आहेत कि एका पक्षाचे? अशा शब्दात न्यायालयाने मुख्यमंत्र्यांवर तोशरे ओढले होते.

यासंदर्भात अशोक चव्हाण म्हणाले, उच्च न्यायालयाला अशा तीव्र शब्दांमध्ये आपली भावना व्यक्त करावी लागली याचे कारण राज्याचे मुख्यमंत्री संविधानाप्रमाणे नाही तर संघाच्या विचारधारेनुसार काम करत आहेत. गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री हे पूर्णपणे अपयशी व अकार्यक्षम ठरले आहेत. संघ विचारधारा ही कायम संविधान विरोधी राहिलेली आहे. आपल्या विरोधकांचा आवाज दाबण्याकरिता संघ कोणत्याही थराला जाऊ शकतो. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे हे कायम संघ विचारधारेच्या विरोधात लढले. त्यामुळेच त्यांच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात सरकारला रस नाही, असे दिसत आहे.

यासंदर्भात कॉंग्रेस पक्षाने मुख्यमंत्र्यांकडे स्पष्टीकरण मागूनही त्यांनी अद्यापही दिलेले नाही, याकडे लक्ष वेधतानाच उच्च न्यायालयाच्या वक्तव्यावरून हा रिपोर्ट सत्यच होता हे स्पष्ट झाले आहे, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.


जाणिवपूर्वक तपास मंद

मुंबईजवळ नालासोपारा येथे सापडलेल्या बॉम्बसाठ्या प्रकरणी तपासाचे धागेदोरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या बड्या नेत्यांपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच पंतप्रधानांच्या सांगण्यानुसारच मुख्यमंत्र्यांनी जाणिवपूर्वक तपास मंद करण्याचे आदेश दहशतवाद विरोधी पथकाला दिले आहेत, असा गंभीर ठपका इंडिया स्कूप नावाच्या वेबसाईटने दिलेल्या रिपोर्टमध्ये मुख्यमंत्र्यांवर ठेवला आहे, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)