18 दिवसांनी इस्पितळात भेट द्यायला गेलेल्या मुख्यमंत्री नितीश कुमारांना काळे झेंडे

मुजफ्फरपूर – बिहारमध्ये मेंदूज्वराने थैमान घातले असून मुझफ्फरपूरमध्ये या आजाराने दगावणाऱ्यांच्या बालकांची संख्या वाढतच चालली आहे. बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये मेंदू ज्वरामुळे 108 मुलांचा मृत्यू झाला आहे. मात्र, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तब्बल 18 दिवसांनी इस्पितळात भेट देण्यास पोहोचल्याने बाहेरील नागरिकांनी जोरदार विरोध केला. तसेच काळे झेंडे दाखवत चले जावचे नारे दिले. तर मृत मुलांच्या नातेवाईकांनी नितीश कुमार मुर्दाबादचे नारे दिले.


तत्पूर्वी,लिची खाल्ल्यानंतरच मुलांना ताप आल्याचा दावा केला जात आहे. गेल्या 24 दिवसांत या मेंदूज्वराने बिहारमध्ये हाहाकार उडवला आहे. विशेष करून मुजफ्फरपूर आणि त्याला लागून असलेल्या परिसरात या आजाराने ग्रस्त रुग्णांचा आकडा वाढत आहे. या आजाराच्या विळख्यात प्रामुख्याने पंधरा वर्षांखालची मुले सापडली असून यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एक ते सात वर्षांपर्यंतच्या मुलांचा आकडा सर्वाधिक आहे.ताप, उलट्या, जुलाब, बेशुद्ध पडणे आणि थकवा जाणवणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही आरोग्य विभागाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here