चिदंबरम यांची पुन्हा ईडीकडून चौकशी

नवी दिल्ली: माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांची आज पुन्हा सक्त वसुली विभाग म्हणजेच ईडीकडून चौकशी करण्यात आली. आयएनएक्‍स मिडीयाच्या मनिलॉंड्रींग प्रकरणात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या अनुषंगाने त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात त्यांची चौकशी होण्याची ही दुसरी वेळ आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला. चिदंबरम यांची ईडीकडून एअरसेल मॅक्‍सिस कंपनीच्या गैरव्यवहार प्रकरणातही चौकशी सुरू आहे. ईडीकडून चिदंबरम यांना आयएनएक्‍स मिडीया प्रकरणात अटक होण्याची शक्‍यता असल्याने त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यात न्यायालयाने त्यांना 15 जानेवारी पर्यंत अटक न करण्याचा दिलासा दिला आहे. या प्रकरणात चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती हेही आरोपी असून ईडीने त्यांची भारतातील आणि विदेशातील अशी मिळून एकूण 54 कोटी रूपयांची संपत्ती जप्त केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)