छत्तीसगडच्या मंत्रिमंडळात नऊ मंत्र्यांचा समावेश

रायपुर: छत्तीसगडच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज करण्यात आला. तेथे आज नऊ मंत्र्यांना अधिकारपदाची शपथ देण्यात आली. त्यात एका महिला मंत्र्याचा समावेश आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या आता 12 झाली आहे. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी नव्या मंत्र्यांना शपथ दिली.

मुख्यमंत्री बाघेल यांच्या मंत्रिमंडळात टी. एस. सिंग देव आणि तामरध्वज साहु यांची या आधीच कॅबिनेट दर्जाचे मंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांबरोबरच 17 डिसेंबर रोजी शपथ घेतली आहे. मंत्रिमंडळात मोहंमद अकबर यांचाही समावेश करण्यात आला असून ते या मंत्रिमंडळातील एकमेवर मुस्लिम मंत्री आहेत. अकबर हे चार वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. अनिला भेदिया या महिला आमदारालाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.प्रदेश कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष शिवकुमार दहारिया यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. मंत्र्यांचे खाते वाटप अद्याप जाहीर व्हायचे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)