छत्तीसगड : सुकमा येथील नक्षली हल्ल्यात १ जवान शहीद तर ३ गंभीर जखमी

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली – छत्तीसगडमधील सुकमा येथील खेरपालमध्ये आयईडी स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये पोलीसांचे चार जवान जखमी झाले आहेत. चार जखमी जवानांपैकी ‘ज्ञानचंद प्रधानी’ हा जवान शहीद झाला असून बाकी ३ जवान गंभीर जखमी आहेत.

शनिवारी दुपारी जवान शोधमोहिमेवर असताना हा स्फोट झाला आहे. स्फोटाचा आवाज एेकताच बाकी सुरक्षादलाचे जवान घटनास्थळी पोहचले. जखमीना रूग्णलयात दाखल केले. सध्या सुरक्षादलाच्या जवानांनी या परिसरास घेराव घातला असून शोधमोहिम चालू आहे. अशी माहिती बस्तरचे आयजी विवेकानंद सिन्हा यांनी  दिली आहे.  या स्फोटाची माहिती कळताच सुरक्षादलाचे जवान घटनास्थळी पोहचले आणि जखमी जवानांना रूग्णलयात दाखल करण्यात केले. जखमी जवानांवर  सुकमा येथील रूग्णालयात उपचार चालू आहेत.

दरम्यान शुक्रवारी करगिल यादव नावाच्या एका नक्षलवादी रांची पोलिसांना शरण आला होता. तसेच पोलिसांनी नक्षली कमांडर गंझू उर्फ बिशू याला अटक केले होते.  अलीकडेच पोलिसांनी नक्षलवाद्यांवर मोठी कारवाईसुध्दा केली होती. पोलिसांनी एका चकमकीत 14 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)