छत्तीसगडच्या नक्षल प्रभावित भागात मतदान अधिकारी हेलिकॉप्टरने रवाना 

रायपूर (छत्तीसगड) – छत्तीसगडच्या नक्षल प्रभावित भागात मतदान अधिकारी व कर्मचारी हेलिकॉप्टरने रवाना करण्यात आले आहेत. नारायणपूर जिल्ह्यातील 16 मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात मतदान सामग्री रवाना करण्यात आली. नक्षलींनी केलेल्या मतदान बहिष्कारामुळे कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात भयाचे वातावरण बनलेले आहे.

छत्तीसगडमधील 18 विधानसभा जागांसाठी अर्धसैनिक दलाच्या 700 कंपन्या तैनात करण्यात आल्या असून देखरेखीसाठी ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. मतदान केल्यानंतर मतदारांसाठी सेल्फी झोन करण्यात आलेले आहेत. येथून मतदार मतदान केल्यानंतर आपल्या बोटावरील शाई दाखवत सेल्फी काढून पाठवू शकतील.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)