छत्तीसगड – छत्तीसगड येथील सुकमा जिल्यातील ‘गोगुंडा’जवळ जिल्हा राखीव दलाचे (DRG) दोन जवान गंभीर जखमी झाले आहे. मंगळवारी (21 मे) सुकमा जिल्ह्यातील गोगुंडाजवळ मोठा आयईडी ब्लास्ट झाला होता. त्यामध्ये हे जवान जखमी झाल्याचे समोर आले आहे. सध्या दोन्ही जवानांची प्रकृती गंभीर आहे.
सुकमाचे सहायक पोलीस अधीक्षक ‘शालभ सिन्हा’ यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी झालेल्या जवानांची प्रकृती गंभीर असल्या कारणाने त्यांना उपचारासाठी तातडीने विमानाने रायपूर येथे हलवण्यात येत आहे. यापूर्वी देखील छत्तीसगडमधील धनिकरका येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली असून, या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला होता.
Shalabh Sinha, ASP Sukma: Both the jawans are conscious. We are trying to airlift them to Raipur for better treatment. https://t.co/ekniw67ySz
— ANI (@ANI) May 21, 2019