छत्तीसगडमध्ये दोन महिन्यांसाठी फटाकेबंदी लागू

file photo

रायपूर (छत्तीसगड): छत्तीसगडमधील सहा शहरांमध्ये दोन महिन्यांसाठी फटाकेबंदी लागू करण्यात आली आहे. 1 डिसेबर 2018 पासून े 31 जानेवारी 2019 पर्यंत ही फटाकेबंदी लागू राहणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. रायपूर, विलासपूर, भिलई, दूर्ग, रायगड आणि कोरबा या सहा शहरांमध्ये वायुप्रदूषणवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही फटाकाबंदी लागू करण्यात आली असल्याचे छत्तीसगड ईसीबी (एन्व्हायर्नमेंट कंट्रोल बोर्ड) चे प्रवक्ते प्रकाश सावंत यांनी म्हटले आहे.

फटाकाबंदी लागू करण्यात आली असली, तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार क्रिसमस आणि नववर्षाला रात्री 11.55 ते 12.30 या वेळात फटाके वाजवण्यास परवानगी देण्यात येणार आहे. राज्य सरकारने सन 2017 मध्ये सहा शहरांमध्ये वायुप्रदूषण (प्रतिबंध व नियंत्रण) कायद्याच्या कलम 19(5) नुसार दोन महिन्यांसाठी फटाकेबंदी जारी केली होती, आणि त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे, असेही प्रकाश सावंत यांनी स्पष्ट केले आहे. रायपूर शहरामध्ये विविध ठिकाणी वातावरण गुणवत्ता नियंत्रण केंद्रे कार्यरत आहेत. या सर्व प्रयत्नांमुळे रायपूरचे वातावरण “चांगले’ ठेवण्यात यश आले असल्याचे प्रकाश सावंत यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)