राष्ट्र घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार-विचार गरजेचे 

लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांचे प्रतिपादन 

नवी दिल्ली – राष्ट्र घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार-विचार वर्तमानातही गरजेचे असल्याचे, प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आज येथे केले. इंदिरा गांधी कला केंद्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उत्सव मोठया थाटामाटात करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणुन सुमित्रा महाजन उपस्थित होत्या. मराठा रेजीमेंटचे लेफ्टनंन जनरल पी.जे.एस. पन्नु, खासदार संभाजी छत्रपती यावेळी मंचावर उपस्थित होते. मंचावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अपर्ण केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्रासह देशाच्या काना-कोपरात शिवाजी महाराज जयंती उत्साहाने साजरी केली जाते. देशाच्या राजधानी होणारा हा सोहळा सर्वांनाच प्रेरणादायी असा आहे. शिवाजी महाराजांचे कार्य कर्तृत्व मोठे असून हिंदवी स्वराज्यासाठी दिलेला लढा, केलेले पराक्रम, सुराज्य निर्मीतीसाठी उचलेली पावले हे सदा-सर्वदा सर्वांसाठी आर्दश असेच राहील. देशभरातील सर्वच सैनिकी तुकडयांचे घोषवाक्‍य हे देवी-देवतांच्या, महापुरूषांच्या नावाने होत असतो, कारण त्यांच्या शौर्य गाथांनी बळ निर्माण होत आहे. या देशातील प्रत्येक आईने जिजामातेचा आदर्श घेऊन आपल्या अपत्यांना शिवाजी महाराज, संभाजी महाराजासारखे घडवावे, त्यांना सुस्कृंत करावे, देशप्रेम जागृतीवर भर द्यावा, असा संदेशही महाजन यांनी दिला आणि शुरवीर ताराराणी यांचे विस्तारीत चरित्र जगासमोर आणण्याची विनंतीही संभाजी छत्रपती यांना केली.

चौकट
मराठा रेजीमेंटची 250 वर्षांची गौरवशाली पंरपरा –
मराठा रेजीमेंटची 250 वर्षांची गौरवशाली पंरपरा असल्याचे सांगुन मराठा रेजीमेंटचे लेफ्टनंन जनरल पी.जे.एस. पन्नु म्हणाले, देशाच्या सरंक्षणार्थ सदैव हे रेजीमेंट त्तपर असते. या रेजीमेंटच्या सैनिकांनी दोन्ही महायुद्धात आपल्या जीवाची पर्वा न करता सहभागी झाले आहेत. त्या काळात व्हिकटोरीया क्रॉस पुरस्कारानेही मराठा रेजीमेंटला गौरविण्यात आलेले आहे. सध्या मराठा रेजीमेंटमध्ये 40 हजार सैनिक आहेत. देशाच्या संरक्षर्णाथ दिले जाणारा सर्वोच्च सन्मान मराठा रेजीमेंटच्या सैनिकांना मिळालेले असून यासह अनेक सन्मानानेही गौरविण्यात आलेले असल्याचे पन्नु यांनी सांगितले.
दरवर्षी 4 फेब्रुवारी हा दिवस मराठा रेजीमेंटमध्ये “मराठा दिन’ म्हणुन साजरा करण्यात येतो. याच दिवशी सिंहगड (कोडांना किल्ला) तानाजी मालुसुरे यांनी जिकंला होता, अशी माहिती पन्नु यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)