छत्रपती कारखान्याच्या अध्यक्षांची आत्महत्या?

बंदूक साफ करताना गोळी उडालीचीही चर्चा

भवानीनगर – येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रदीप केशवराव निंबाळकर (वय 50) यांचा आज (सोमवारी) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बंदुकीतील गोळी लागून मृत्यू झाला. मात्र ही घटना घडली त्याठिकाणी एक चिठ्ठी सापडल्याची माहिती सुत्रांनी दिली. यामुळे त्यांचा मृत्यू बंदूक साफ करताना चुकून गोळी उडाल्याने झाला की त्यांनी स्वत: गोळी झाडून आत्महत्या केली, याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा आहे.

सणसर (ता. इंदापूर) येथील राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर प्रदीप निंबाळकर आज दुपारी रिव्हॉल्वर साफ करीत होते. त्यावेळी चुकून गोळी उडाल्याने ते जखमी झाले. गोळीच्या आवाजाने घरातील सदस्यांनी जाऊन पाहिले असता, ते रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यानंतर तातडीने त्यांना बारामतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी जाहीर केले. दरम्यान, निंबाळकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह कारखाना परिसरात सायंकाळी आणल्यानंतर त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. निंबाळकर यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, वालचंदनगर पोलीस ठाण्यात घटनेची सायंकाळी उशीरापर्यंत नोंद करण्यात आलेली नव्हती. पुढील तपास वालचंदनगर पोलीस करीत आहेत.

केवळ पाच दिवसांचेच अध्यक्षपद
राज्यातील सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या श्री छत्रपती साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार? ही चर्चा सुरू असताना गेल्या 61 वर्षांत झाले नाही असा इतिहास घडवत निंबाळकर कुटुंबात कारखान्याचा अध्यक्ष होण्याचा पहिला मान प्रदिप निंबाळकर यांनी मिळवला. 31 ऑक्‍टोबर रोजी त्यांनी कारखारखान्याचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांच्या निवडीनंतर जेसीबीने गुलाल उधळून आनंदोत्सवही साजरा करण्यात आला होता; परंतु आज झालेल्या त्यांच्या मृत्यूमुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रासह इंदापूर व बारामती परिसरात मोठा धक्का बसला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)