लोकसभा निकालाबाबत छगन भुजबळ यांचे अंदाज

नाशिक- लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास केवळ एकच दिवस राहिला आहे. परंतु, त्याआधी विरोधकांनी ईव्हीएम मशीनच्या छेडछाडीवरून रान उठविले आहे. अशातच छगन भुजबळ यांनी मोदी लाट ओसरली असल्याची टीका केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. छगन भुजबळ म्हणाले, ‘2014  मध्ये मोदी लाट होती, मात्र आता त्या लाटे विरोधात लाट आहे. नरेंद्र मोदींविरोधात देशभरात असंतोष पसरला आहे. तसेच देशात अघोषीत आणीबाणी असल्याचं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.

लोकसभा निकालांबाबतही छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. एक्झिट पोल्सच्या अंदाजांवर मला विश्वास नाही, असं ते म्हणाले आहेत. दरम्यान, शरद पवार पंतप्रधान झाले तर आनंदच आहे. मराठी व्यक्ती पंतप्रधान व्हावा अशी जनतेची इच्छा आहे, असंही ते म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)