रणजी ट्राफी : मान दुखीमुळे पूजारा झाला निवृत्त

राजकोट : राजकोट येथे रणजी ट्राफी स्पर्धेतील सौराष्ट्र विरूध्द छत्तीसगड यांच्यात सामना सुरू आहे. भारतीय कसोटी संघातील फलंदाज चेतेश्वर पूजारा हा सौराष्ट्र संघात आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी चेतेश्वर पूजारा याला मान आखाडल्याने फलंदाजी करता करता निवृत्त व्हावे लागले आहे.

सौराष्ट्र संघाचा फलंदाज पुजारा याला सामन्याच्या सकाळी मानदुखीचा त्रास होत होता, त्यामुळे काही वेळानंतर तो तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करण्यासाठी उतरला. त्याने दुखापतीमुळे निवृत्त होण्याच्या आधी 64 चेंडूत 30 धावा काढल्या आहेत. दुखापतीमुळे त्याने फिजियोच्या सल्ल्यानुसार मैदान सोडण्याचा निर्णय घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)