बुध्दीबळ स्पर्धेत रणवीर मोहिते विजेता

पुणे – अनुभवी खेळाडू रणवीर मोहिते याने एक दिवसीय जलद बुध्दीबळ स्पर्धेत अजिंक्‍यपद पटकाविले. ही स्पर्धा व्हिक्‍टोरियस अकादमीतर्फे आयोजित करण्यात आयोजित करण्यात आली होती. निखिल दीक्षित याने उपविजेतेपद मिळविले.

रणवीर व निखिल यांचे प्रत्येकी सहा गुण झाले. प्रगत गुणांच्या आधारे त्यांना अनुक्रमे पहिले दोन क्रमांक देण्यात आले. हिमांशु छाब्रा व विकास शर्मा यांनी प्रत्येकी साडेपाच गुण घेतले. प्रगत गुणांच्या आधारे त्यांना अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक देण्यात आला. कपील लोहाना याने पाचवे स्थान मिळाले. स्पर्धेतील 1201 ते 1400 मानांकनाच्या खेळाडूंच्या विभागात ओंकार देशपांडे विजेता ठरला. त्याने पाच गुणांची कमाई केली. 1200 पेक्षाखालील मानांकनाच्या विभागात आदिती कयाळ हिने प्रथम स्थान घेतले.

बिगर मानांकित खेळाडूंमध्ये हर्षद हगवणे याने प्रथम क्रमांक मिळविला. सर्वोत्कृष्ट महिला व ज्येष्ठ खेळाडू म्हणून अनुक्रमे दिशा ढोरे व प्रदीप कुलकर्णी यांची निवड झाली. 9 व 11 वर्षाखालील गटात अनुक्रमे आरूष कदम व अक्षज पाटील यांना विजेतेपद मिळाले. साईराज गायकवाड याला विशेष पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आंतरराष्ट्रीय मास्टर व प्रशिक्षक जयंत गोखले यांच्या हस्ते झाला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)