#IPL2019 : धमाकेदार दिल्लीसमोर आज चेन्नईचे आव्हान

अनुभवी विरुद्ध नवोदित असा सामना रंगणार; फलंदाजांविरुद्ध गोलंदाजांचा सामना रंगणार

चेन्नई सुपर किंग्ज वि. दिल्ली कॅपिटल्स

वेळ – रा. 8.00 वा.
स्थळ – फिरोज शाह कोटला मैदान, दिल्ली

नवी दिल्ली  -आयपीएलच्या बाराव्या हंगामातील आपले पहिले सामने जिंकून धमाकेदार सुरुवात करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ आज समोरासमोर येणार असून दिल्लीचा संघ हा आयपीएलमधील सर्वात तरुण खेळाडूंचा संघ समजला जातो तर चेन्नईचा संघ सर्वात वयस्कर खेळाडूंचा संघ समजला जातो त्यामुळे आज अनुभवी विरुद्ध नवोदित असा सामना रंगणार आहे.

विशेष म्हणजे दोन्ही संघांनी आपापल्या पहिल्या सामन्यात विक्रमी कामगिरी करत चमकदार सुरुवात केली आहे. ज्यात दिल्लीच्या संघाने मुंबई विरुद्ध पहिल्याच सामन्यात दोनशे धावांचा पल्ला ओलांडला तर चेन्नईने पहिल्याच सामन्यात बंगळुरूच्या संघाला केवळ 71 धावांमधेच तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे धमाकेदार फलंदाजांविरुद्ध भेदक गोलंदाजांदरम्यान हा सामना होणार आहे.

यावेळी मुंबई विरुद्धच्या पहिल्या सामन्यात दिल्लीच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी करत सावध आणि गरजेच्या वेळी आक्रमक फलंदाजी करत त्यांचा संघ या मौसमात नवी उमेद घेऊन मैदानात उतरलेला असल्याचे दाखवले असून पहिल्या सामन्यात दिल्लीच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी कमाल दाखवत मुंबईच्या गोलंदाजांवर वरचढ ठरले होते.

ज्यामध्ये शिखर धवन, कॉलिन इन्ग्राम, ऋषभ पंत आणि राहुल तेवतिया या फलंदाजांनी दिल्लीला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला होता. तसेच दिल्लीच्या गोलंदाजांनीही मुंबईच्या फलंदाजांना जास्त मोकळीक न मिळू देता भेदक गोलंदाजी करत मुंबईच्या फलंदाजांना रोखण्याचे काम केले. यावेळी कगिसो रबाडा आणि बऱ्याच वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या ईशांत शर्माने मुंबईला सुरुवातीलाच धक्‍के देत सामन्यावर वर्चस्व निर्माण केले.

तर, दुसरीकडे चेन्नईच्या संघाने आपल्या पहिल्या सामन्यात बलाढ्य फलंदाजांची फळी असणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला केवळ 71 धावांमध्ये रोखत धमाकेदार सुरुवात केली ज्यात अनुभवी हरभजन सिंगने 20 धावा देत तीन गडी बाद केले तर इम्रान ताहिरने केवळ 9 धावांमध्ये 3 गडी बाद करत बंगळुरूच्या संघाचे कंबरडे मोडले. यावेळी प्रत्युत्तरात खेळताना अंबाती रायडू आणि सुरेश रैना यांनी चांगली कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे आजच्या सामन्यात बलाढ्य गोलंदाजी विरुद्ध धमाकेदार फलंदाजी असा सामना पहायला मिळेल.

प्रतिस्पर्धी संघ –

चेन्नई सुपर किंग्ज – महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, फाफ डू प्लेसीस, मुरली विजय, रवींद्र जडेजा, सॅम बिलिंग्स, मिचेल सॅंटनर, डेव्हिड विली, ड्‌वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, लुंगी एन्गिडी, इमरान ताहिर, केदार जाधव, अंबाती रायडू, हरभजन सिंह, दीपक चहर, के एम आसिफ, कर्ण शर्मा, ध्रुव शौरी, एन जगदीशन, शार्दुल ठाकूर, मोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड.

दिल्ली कॅपिटल्स – श्रेयस अय्यर (कर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, अमित मिश्रा, आवेश खान, हर्षल पटेल, राहुल तेवतिया, जयंत यादव, मनजोत कालरा, कॉलीन मुनरो, कगिसो रबाडा, संदीप लामिचाने आणि ट्रेंट बोल्ट, हनुमा विहारी, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, अंकुश बॅंस, नाथू सिंह, कॉलिंग इंग्राम, शरफेन रदरफोर्ड, किमो पाउल, जलज सक्‍सेना, बंडारु अय्यप्पा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)