चेन्नई-अहमदाबाद विशेष रेल्वे पुणे मार्गे धावणार

पुणे – प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता चेन्नई-अहमदाबाद दरम्यान विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पुण्याहून या भागात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे ही रेल्वे ती पुणेमार्गे धावणार आहे. या रेल्वेला दोन वातानुकूलित थ्री-टियर, दहा स्लीपर, दोन जनरल कोच जोडण्यात येणार आहेत. या रेल्वेचे आरक्षण सुरू करण्यात आले आहे.

दि. 11 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर चेन्नई-अहमदाबाद (06051)
– दर शनिवारी येथून रात्री 8.10 सुटणार.
– पुणे स्थानकात रविवारी सायंकाळी 5.15 वाजता येणार.
– सोमवारी पहाटे 5.45 वाजता अहमदाबाद येथे पोहोचणार.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दि. 13 ऑगस्ट ते 1 ऑक्‍टोबर अहमदाबाद-चेन्नई (06052)
– दर सोमवारी सकाळी 9.40 वाजता सुटणार
– पुण्यात त्याच दिवशी रात्री 9.05 वाजता पोहोचेल.
– चेन्नई येथे मंगळवारी सायंकाळी 5.10 वाजता पोहोचणार.

येथे असेल थांबा
अहमदाबाद-चेन्नई-अहमदाबाद रेल्वेला वडोदरा, सुरत, वापी, वसई रोड, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, सोलापूर, वाडी, रायचूर, गुंटकल, गुटी, पेरंबूर येथे थांबा देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)