एटीएसने ९ जणांना केली अटक ; कुंभमेळ्यात हल्ला करण्याचा होता कट

मुंबई: महाराष्ट्र एटीएसने आज ९ जणांना अटक केली आहे. कुंभमेळ्यात अन्नपदार्थ पाण्यामध्ये रसायन मिसळून हल्ला करण्याचा कट एटीएसने उधळला आहे. त्यांच्याकडून ६ पेन ड्राईव्ह, २४ मोबाइल, ६ लॅपटॉप, ६ वायफाय पॉड्स, २४ डीव्हीडी आणि सीडी, १२ हार्ड डिस्क आणि ६ हून अधिक मेमरी कार्ड जप्त करण्यात आले आहेत.

याप्रकरणी एटीएसने मंगळवारी ९ संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. या संशयित दहशतवाद्यांचा अन्नपदार्थांत किंवा पाण्यात विषारी रसायन मिसळून घातपात करण्याचा कट होता. सलमान खान, फहाद शाह, झमेन कुटेपडी, मोहसीन खान, मोहम्मद मझर शेख, ताकी खान, सरफराज अहमद, झाहीद शेख आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा या संशयितांना मुंब्रा आणि औरंगाबाद येथून मंगळवारी अटक करण्यात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितूनुसार या दहशतवाद्यांनी औरंगाबाद आणि मुंबईतील घरातच प्रयोगशाळा बनवल्या होत्या. तसेच अटक केलेल्या ९ जणांपैकी झमेन हा वैद्यकीय प्रतिनिधी होता. त्याला रसायनाबाबत माहिती होती. त्याच्या मदतीने रासायनिक हल्ला करण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तर एक जण दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय रशीद मलबारीचा मुलगा असल्याचे देखील उघड झाले आहे.

या कारस्थानासाठी संशयित दहशतवाद्यांनी “उम्मते -ए – मोहमदिया अल्लाह के अवाम” नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप बनविल्याचे तपासात समोर आले आहे.

https://twitter.com/ANI/status/1088051171468759040?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1088051171468759040&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmumbai-news%2Fchemical-attack-plan-in-kumbh-mela-busted-by-maharashtra-ats-in-mumbai-1828365%2F

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)