चेंबूरमधील आगप्रकरणी विकासकांवर गुन्हा दाखल

मुंबई: टिळकनगर येथील सरगम सोसायटीत लागलेल्या आगप्रकरणी विकासकांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सरगम इमारतीत लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ही इमारत स्थानिक रहिवाशांनी मे. रिलायन्स रिअल्टर्सचे पार्टनर्स हेमेंद्र मापारा, सुभक मापारा व कोठारी यांना मे 2006 मध्ये पुनर्विकासासाठी दिली होती.

इमारतीचे बांधकाम पूर्ण करून विकासकाने 2014 मध्ये त्याचा ताबा फ्लॅटधारकांना दिला. मात्र, या इमारतीची अग्निशमन यंत्रणा विकासकाने योग्यरितीने कार्यान्वित केली नाही. नियमानुसार 15व्या मजल्यावर ठेवण्यात येणाऱ्या रिफ्यूजी एरियामध्ये म्हणजेच मोकळ्या जागेमध्ये भिंत घालून इमारतीतील बी विंग व सी विंग यांना जोडणारा आपत्कालीन मार्ग बंद केला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बिल्डरने इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र व अग्निशमन विभागाचे प्रमाणपत्र नसतानाही फ्लॅटधारकांना या इमारतीत राहण्यास भाग पाडले होते. त्यामुळे या आगीच्या दुर्घटनेला हे विकासक कारणीभूत असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)