अझहर मसुदच्याबाबतीत अन्य पर्यायांची चाचपणी

वॉशिंग्टन – संयुक्‍त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये अझहर मसुदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी चीनने अडथळा आणल्यामुळे आता या परिषदेतील काही जबाबदार देशांनी मसुदबाबत अन्य पर्यायांचा विचार करायला सुरुवात केली आहे. संयुक्‍त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने स्वतःची ओळख न सांगता याबाबत माहिती दिली.
पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर अझहर मसुदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याचा प्रस्ताव फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिकेने 27 फेब्रुवारीला मांडला होता. चीनने तांत्रिक मुद्दे पुढे करून अझहर मसुदची पुन्हा एकदा पाठराखण केली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या काही जबाबदार देशांनी चीनला याबाबत इशाराही दिला आहे. जर चीनने यानंतरही अशी आडकाठी आणणे सुरुच ठेवले तर सुरक्षा परिषदेला अन्य पर्यायांचा विचार करावा लागेल, असे या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. भारतानेही चीनच्या भूमिकेविषयी तीव्र नापसंती व्यक्‍त केली आहे. मात्र उपलब्ध असलेल्या सर्व मार्गांचा अवलंब केला जाईल, असेही भारताने स्पष्ट केले आहे.

चीनकडून अशाप्रकारे आडकाठी करण्याची ही चौथी वेळ आहे. यानंतर चीनने सुरक्षा परिषदेला अभिप्रेत असलेले काम करण्यासाठी चीनने अडथळा आणता कामा नये, असे या परिषदेतील अन्य अधिकाऱ्याने सांगितले. तर अन्य एका सदस्याने दहशतवाद्यांच्या संरक्षणासाठी चीनवर अवलंबून राहिल्याबद्दल पाकिस्तानवरही टीका केली. आहे. पाकिस्तानातील दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी पाकिस्तान नेहमीच चीनची मदत घेत आहे. अझहर मसुद हा अल कायदाशी संबंधित दहशतवादी आहे आणि अल कायदाला यापूर्वीच आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित केले गेले आहे. त्यामुळे जैश ए मोहम्मद आणि त्याच्या म्होरक्‍याची माहिती उघड आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. अमेरिकेतील काही संरक्षण तज्ञांनीही चीनच्या भूमिकेवर टीका केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)