‘ठाकरे’ सिनेमासाठी ‘चीट इंडिया’चं प्रदर्शन पुढे ढकलले

मुबंई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बहुचर्चित ठाकरे हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला रिलीज होणार आहे. त्याचदिवशी शौमिक सेन दिग्दर्शित चीट इंडिया आणि कंगनाचा मणिकर्णिका प्रदर्शित होणार आहे. त्याच दिवशी अजून कुठला सिनेमा रिलीज होऊ नये, अशी शिवसनेची इच्छा आहे.

त्या पार्श्वभूमीवर ठाकर सिनेमासाटी इम्रान हाश्मीच्या चीट इंडियाच प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शिवसेनेने चीट इंडियाच्या निर्मात्यांना केलेली विनंती त्यांनी मान्य केली आहे. याबाबत आज संध्याकाळी एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात ही घोषणा होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर दुसरीकडे मणिकर्णिका द क्वीन आॅफ झांशी या चित्रपटापटाच्या प्रदर्शनाविषयी माहिती मिळालेली नाही. मात्र ठाकरे सिनेमांसाठी या चित्रपटांची तारीख पुढे ढकलली जाईल असा विश्वास व्यक्त केला दात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)