“चीट इंडिया’चे नाव आता “व्हाय चीट इंडिया’

इम्रान हाश्‍मीच्या आगामी “चीट इंडिया’च्या नावाला सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्यामुळे आता निर्मात्यांनी सिनेमाच्या नावात “व्हाय चीट इंडिया’ असा बदल केला आहे. या सिनेमाच्या नावाच्या बदलाच्या मुद्दयावरून सेन्सॉर बोर्डाच्या एक्‍सामिनिंग कमिटी आणि रिव्हायसिंग कमिटीमध्ये खूप चर्चा झाली. गेल्या वर्षभरापासून सिनेमाचे नाव जाहीर केले गेले आहे. तसेच सिनेमाचा टीजर, ट्रेलर आणि टेलिव्हिजन प्रोमोना मूळ नावानेच सर्टिफिकेट दिले गेले आहे.

आता सिनेमा रिलीज करण्याच्या एक आठवडाभर आगोदर हे सगळे नव्या नावाने पुन्हा रिलीज करावे लागणार आहे. हातात थोडा वेळ शिल्लक राहिलेला असताना “व्हाय चीट इंडिया’ या नवीन नावावर एकमत झाले, असे निर्मात्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. इम्रान हाश्‍मी, टी सिरीज आणि एलिप्सिस एन्टरटेनमेंटने या सिनेमाची निर्मिती केली आहे. नावात बदल होण्याबाबत इम्रान हाश्‍मीने ट्‌विटरवरून खिल्ली उडवली आहे. त्याने नवीन नावाचे पोस्टर ट्‌विटरवर रिलीज केले आणि आपले नाव “व्हाय इम्रान हाश्‍मी’ असे घोषित केले आहे. त्याबरोबर “का’ (व्हाय) असा प्रश्‍न विचारु नका, अशी सूचनाही त्याने केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)