साताऱ्यात पाऱ्याने ओलांडली चाळीशी

नागरिकांना जाणवू लागली धगधगत्या उन्हाची तीव्रता

सातारा – मार्च महिना उजाडल्यापासून सातत्याने साताऱ्याच्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या सहा दिवसांपासून चाळिशी ओलांडत गुरुवारी चालू वर्षातले 41.2 अंश सेल्सिअस तापमान येथील हवामान खात्याच्यावतीने नोंदले गेले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून सकाळी 9 वाजल्यापासूनच धगधगत्या उन्हाची तीव्रता सातारकरांना जाणवू लागली आहे. यामुळे भोवळ येणे, डोके, कानशिलांचा बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या आकारांच्या टोप्यांचा आणि गॉगलचा वापर होऊ लागला आहे. प्रामुख्यानं नोकरी, शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने मंडळी बाहेर पडू लागली आहेत. दुपारच्या वेळी एक ते दोनच्या दरम्यानं बहुतांश रस्त्यांवर तुरळक गर्दी जाणवू लागली आहे.

गेल्या सहा दिवसांपासून म्हणजे 23 तारखेपासून इथल्या हवामान खात्याकडे 40.7, 40 .8, 40.7, 41.2, 41.2 आणि  आज (गुरुवारी) या वर्षातील सर्वोच्च 41.0 म्हणजे 1 अंशाने तापमान वाढल्याची नोंद झाली आहे. वाढत्या उन्हापासून बचावासाठी नागरिकांनी शुभ्र, तलम वस्त्रे वापरावीत. दुपारच्यावेळी बाहेर पडू नये. लहान मुले आणि वृद्धांची दक्षता घ्यावी. मधुमेही, दम्याच्या रुग्णांनी विशेष खबरदारी घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)