राजकीय नेत्यांचे बदलते पेहराव आणि फॅशन

साधारणपणे दीड ते दोन दशकापूर्वी राजकारणी वा लोकप्रतिनिधी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर गांधी टोपी, धोतर आणि खादीचा कुर्ता परिधान केलेल्या व्यक्‍तीची छबी येत होती. मात्र आता काळ बदलला आहे. साहजिकच या बदलत्या काळात नेत्यांच्या पेहरावामध्येही बदल झाला आहे. अलीकडचे राजकारणी हे स्टायलीश झाले आहेत असे दिसून येते. त्याचबरोबर ते मेकओव्हरवर अधिक लक्ष देत असल्याचेही दिसते. आता बहुतांश राजकारणी हे परंपरागत पोषाखामध्ये न दिसता त्यांनी स्वतःची अशी एक स्टाईल बनवलेली दिसते.

कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी हे बहुतांश वेळा कुर्त्यामध्येच दिसून येतात. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सुप्रिमो अरविंद केजरीवाल यांनी मागील काळात पॅंट, शर्ट, स्वेटर आणि मफलर हा पोषाख हिट केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभांसाठी ज्या ठिकाणी, ज्या प्रदेशात जातात तेथील संस्कृतीनुसार पेहराव ठेवण्यावर भर देतात. राजकारणी मंडळी अलीकडे ग्रूमिंगवरही पैसे खर्च करताना दिसतात. त्यामुळेच राहुल गांधी कधी क्‍लीन शेव्हमध्ये दिसतात, तर कधी दाढीमध्ये दिसतात. नरेंद्र मोदी हे देखील आपला पेहराव, व्यक्‍तिमत्त्व आणि एकूणच लूकबाबत सजग असतात.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)