कोथरूड परिसरात वाहतूक व्यवस्थेत बदल

पुणे -शहरातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीतपणे चालण्याच्या उद्देशाने कोथरूड वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका आदी अत्यावश्‍यक सेवेतील वाहने वगळता अन्य वाहनांना नव्या बदलांचे पालन करणे अनिवार्य आहे. नव्याने बदल केलेल्या ठिकाणांवर पूर्वीचे पार्किंगबाबतचे नियम रद्द करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आली.

करण्यात आलेले बदल पुढीलप्रमाणे :

पी-1, पी-2 संदर्भात बदल :
बाळकृष्ण शंकर तथा भाऊ जोशी रस्त्यावरील जोशी म्युझियमपासून प्रगती इंडस्ट्रीज या मार्गावर पी-1, पी-2 पार्किंग करण्यात येणार आहे. तारा रेसिडेन्सी ते निंबाळकर बागेम्यान पी-1, पी-2 पार्किंग करण्यात येणार आहे. तर माजी सैनिक वसाहतीअंतर्गत पी-1, पी-2 पार्किंग करण्यात येणार आहे.

येथे असेल नो पार्किंग झोन :
कोथरूड परिसरांतील गोपीनगर, गांधीभवन, आशीष गार्डन आणि महात्मा सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना 50 फुट नो पार्किंग करण्यात येणार आहे. एमआयटी कॉलेज रोडवरील परब्रह्मा हॉटेल ते चैतन्य हेल्थ क्‍लब पर्यंतच्या रस्त्यावर नो पार्किंग करण्यात येणार आहे. तर बाळकृष्ण शंकर तथा भाऊ जोशी रस्त्यावरील सदाफुली सोसायटीचे “ब’ गेट ते ऍडेप्ट कंपनीदरम्यान नो पार्किंग करण्यात येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)