पोलीस भरती प्रक्रियेतील बदलांविरोधात विदयार्थ्यांनी उपसले आंदोलनाचे हत्यार

पुणे : पोलीस भरतीसाठी तयारी करणारे हजारो तरुण-तरुणी या आंदोलनात सहभागी झाले

पुणे – राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राबविण्यात यावी, या मागणीसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे हजारो उमेदवाऱ्यांनी आज मोर्चा काढला आहे. पुण्यातील मुठा नदीच्या पात्रातून सुरु झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार असून तिथे हे उमेदवार 11 फेब्रुवारीपर्यंत उपोषणाला बसणार आहेत. तसेच आंदोलन करणारे हे पोलीस भरती स्टुडंट्‌स पुण्यातून मुंबईला धावत जाऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार होते. मात्र महामार्गावरुन धावत जाण्यासाठी त्यांना परवानगी नाकारण्यात आली. अशी माहिती पोलीस भरती स्टुडंट्‌स राइट्‌सच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि,पोलिस भरतीसाठी आधी 100 गुणांची मैदानी चाचणी घेतली जायची आणि त्यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जायची. अशाप्रकारे 200 गुणांमधून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्यांची पोलिस म्हणून भरती व्हायची. मात्र आता लेखी परीक्षा आणि नंतर मैदानी परीक्षा घेण्याचे ऐनवेळी ठरवले आहे. तर मैदानी चाचणीचे गुण 100 वरुन 50 करण्यात आले आहेत.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)