चांडोलीत 2016 स्कूलबस अपघात प्रकरण : चालकास दोन वर्षे सक्‍तमजुरी 

राजगुरुनगर – चांडोली (ता. खेड) येथे दोन वर्षांपूर्वी शालेय बसला अपघात होवून लोखंडी गज शरीरात घुसून विद्यार्थ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बसचालकास दोन वर्षे सक्‍तमजुरीची शिक्षा राजगुरूनगर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. बी. देशमुख यांनी सुनावली आहे.

सचिन बबन बैलभरे (वय 36 , रा. कडूस, ता. खेड) असे शिक्षा झालेल्या स्कूलबस चालकाचे नाव आहे. याबाबतची माहिती अशे की, दि. 4 जुलै 2016 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास चांडोली येथील आर्याज इंग्लिश स्कुलची बस शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घेवून जात असताना शाळेच्या जवळच असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहाच्या मेन गेटला धडकल्याने स्कूल बसला अपघात झाला होता. गेटचे गज चालकाच्या शेजारी बसलेल्या शंभूराज महेंद्र अरगडे (वय 9) व मिहीर संतोष घनवट(वय 9, दोघेही रा. कडूस, ता. खेड) यांच्या पोटात व छातीत आरपार घुसल्याने ते दोघे गंभीर जखमी झाले आहेत.तर उपचारादरम्यान शंभूराज आरगडे या विद्यार्थ्यांचा उपचारादाराम्यान मृत्यू झाला होता. तर हा खटला राजगुरुनगर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी देशमुख यांच्या न्यायालयात सुरू होता तर याचा निकाल सोमवारी (दि. 22) त्यांनी दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या खटल्यात सहायक सरकारी वकील सायली ठोकळ यांनी 5 साक्षीदार तपासले. त्यांचा प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरून निष्काळजी व हलगर्जीपणे गाडी चालवून भीषण अपघात झाला असे या प्रकरणात सिद्ध झाले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी देशमुख यांनी आरोपी सचिन बैलभरेला भादवि कलम 304 अन्वये 2 वर्षे सक्तमजुरी व पाचशे रुपये दंड, भादवि कलम 337 अन्वये 3 महिने सक्तमजुरी व पाचशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक मुखतार शेख यांनी केला होता. तर पोलीस हवालदार सचिन जतकर यांनी या खटल्याचे न्यायालयीन कामकाजात पहिले. या निकालामुळे बेदखल स्कूलबस चालवणाऱ्या चालकांना जरब बसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)