भारताच्या पहिल्या चंद्रयान मोहीमेला जवळपास १०वर्ष उलटल्यानंतर भारतातर्फे आज दुसऱ्या चांद्रयान मोहिमेची अधिकृत तारीख घोषित करण्यात आली आहे. भारताच्या दुसऱ्या चांद्रयान मोहिमेबाबत माहिती देताना भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे प्रमुख के सिवन यांनी येत्या १५ जुलै रोजी भारताचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावेल असं सांगितलं.
भारताच्या चंद्रयान मोहिमेबाबत पत्रकारांशी संवाद साधताना के सिवन यांनी सांगितले की, “जीएसएलव्ही एम के ३ या आंतरिक्षयानातून भारताचे चांद्रयान-२ श्रीहरीकोटा येथील केंद्रावरून १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी उड्डाण करणार आहे. चांद्रयान-२ सप्टेंबर ६ अथवा ७ रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल.”