चंद्रशेखर राव भेटणार ममता बॅनर्जी, मायावतींना

कॉंग्रेस व भाजपाला वगळून तिसरी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न

हैदराबाद -भाजप आणि कॉंग्रेसला वगळून विरोधी पक्षांचे ऐक्‍य करण्याचा प्रयत्न तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सुरू केला आहे. मात्र, यामुळे भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांचे महागठबंधन करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राव बहुमताने विजयी झाले आहेत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता त्यांनी राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी पावले उचलण्यास प्रारंभ केला असून ते मायावती, अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत.

आंध्रच्या जगप्रसिद्ध शारदा पीठाचे दर्शन घेऊन ते आपल्या राजकीय दौऱ्य़ाला प्रारंभ करणार आहेत. प्रथम ते ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे जाऊन ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची भेट घेणार आहेत. पटनाईक प्रारंभापासूनच भाजप आणि कॉंग्रेस यांच्याशी समान अंतर राखून आहेत. त्यानंतर ते कोलकाता येथे ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. बॅनर्जी यांनी प्रथम भाजपविरोधी ऐक्‍याची संकल्पना मांडली होती. नंतर ते मायावती यांच्याशी चर्चा करणार आहेत.

बसप, सप, तृणमूल कॉंगेस आणि बिजद हे पक्ष तिसरी आघाडी करण्याच्या बेतात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. बसप आणि सप लवकरच उत्तर प्रदेशातील आघाडीची घोषणा करण्याची शक्‍यता आहे. या आघाडीत कॉंग्रेसला स्थान मिळण्याची शक्‍यता कमी आहे. राव पंतप्रधान मोदी यांचीही भेट घेणार आहेत. 25 डिसेंबरला ही भेट आयोजित करण्यात आली आहे.

कॉंग्रेसने त्यांच्यावर भाजपचा उपपक्ष असल्याची टीका केली आहे. तरीही ते पंतप्रधानांना भेटणार असून त्यांच्याशी राज्याच्या हिताची चर्चा करणार आहेत, असे त्यांच्या पक्षाने स्पष्ट केले. एकंदर, त्यांच्या या दाऱ्यामुळे तिसरी आघाडी मजबूत करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळेल अशी अपेक्षा राजकीय अभ्यासक व्यक्त करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)