चंद्रशेखर राव यांनी लंडनला जाऊन राहावे : मोदींची टीका 

निजामाबाद: मुख्यमंत्री चंद्रशेखरराव यांच्या सरकारच्या काळात तेलंगणाचा काहींच विकास झाला नाही. त्यांनी निजामाबादचे लंडन करण्याचे आश्‍वासन दिले होते. पण तेही झाले नाही त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षासाठी लंडनला जाऊन राहावे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्यावर निशाणा साधला.

ते म्हणाले की हे राज्य नव्याने स्थापन झाले आहे. त्यामुळे विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा होती पण या सरकारच्या काळात कोठेच काहीं विकास झालेला दिसला नाही. येथे लोकांना अजून मुलभूत समस्यांचाच सामना करावा लागत आहे. लोकांना खोटी आश्‍वासने दिल्याबद्दल त्यांना पदावरून तर घालवले पाहिजेच पण त्यांना शिक्षाही केली पाहिजे.यावेळी कॉंग्रेस आणि टीआरएस या पक्षांमध्ये येथे साटेलोटे झाले असल्याचा आरोपही त्यांनी केला ही निवडणूक त्यांच्यासाठी मॅचफिक्‍सींग आहे. यावेळी कॉंग्रेसवरही त्यांनी टीका केली.

-Ads-

मोदी म्हणाले की कॉंग्रेस आणि टीआरएस हे दोन्हीं पक्ष सारखेच आहेत. दोन्ही ठिकाणी घराणेशाही आहे, दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत लोकशाही नाही, दोन्ही पक्षांमध्ये अल्पसंख्याकांचे लांगुलचालन करण्याचा दुर्गुण आहे. पाच वर्षे सत्तेत राहुन आणि काहीही काम न करता ते जर पुन्हा निवडून येण्याचे स्वप्न बघत असतील तर ते अजिबात शक्‍य नाही कारण आता जमाना बदलला आहे असेही मोदींनी यावेळी नमूद केले. टीआरएसने लवकर निवडणुका जाहीर केल्या हे चांगले झाले कारण लोकांना आता त्यांच्या पासून लवकर सुटका मिळेल अशी मिष्कीलीही त्यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)