चंद्रशेखर राव यांचा राहुल गांधींबरोबर येण्यास नकार

हैदराबाद: तेलंगण राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबरोबर एका मंचावर उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. भाजप आणि कॉंग्रेस शिवायच्या तिसऱ्या आघाडीसाठी राव यांनी काही पक्षांच्या नेत्यांची अलिकडेच भेट घेतली होती. तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही त्यांनी भेट घेतली होती. मात्र ममता बॅनर्जी यांनी या महाआघाडीमधून कॉंग्रेसला वगळण्याच्या प्रस्तावामध्ये विशेष रस दाखवला नव्हता.

तृणमूल कॉंग्रेसच्यावतीने कोलकाता येथे होणाऱ्या विरोधकांच्या सभेला राव उपस्थित राहणार का, असे विचारले असता लोकसभेतील तेलंगण राष्ट्र समितीचे उपनेते बी. विनोद कुमार यांनी “माहिती नाही’ असे उत्तर दिले. या रॅलीला राहुल गांधींसह राव एका मंचावर उपस्थित राहण्याची शक्‍यता कमी असल्याचेही कुमार यांनी सांगितले.

तेलंगणमध्ये “टीआरएस’ सत्तेवर आणि कॉंग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे. गेल्यावर्षी राव यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची “सर्वात मोठा विदूषक’अशी संभावना केली होती. गेल्या महिन्यातील निवडणूकीत “टीआरएस’ने सर्वाधिक 88 जागा जिंकून पुन्हा सत्ता संपादन केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)