चंद्रकांत पाटलांनी घेतली माजी मंत्री विनय कोरेंची भेट ; लोकसभेच्या पाठिंब्या बाबत चर्चा

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने घेतली भेट…

कोल्हापूर: राज्यात युतीन प्रचारात आघाडी घेतली आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही युतीच्या उमेदवारांसाठी कंबर कसली आहे. चंद्रकांतदादाचा प्रभाव असलेल्या कोल्हापूर, सांगली, हातकणंगले आणि सातारा या लोकसभा मतदारसंघांपैकी फक्त सांगली हाच मतदारसंघ भाजपाकडे आहे मात्र चंद्रकांतदादांनी या चारही मतदारसंघात हालचाली सुरू केल्या आहेत. आज चंद्रकांतदादांनी जनसुराज्य पक्षाचे सर्वेसर्वा विनय कोरे यांची वारणानगर येथे भेट घेतली. हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचे धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. विनय कोरे यांची भेट मानेना मदत करावी यासाठीच असल्याची चर्चा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या मतदारसंघाचे खासदार राजू शेट्टी यांना मतदारसंघातच रोखण्यासाठी रणनीतीचाच हा भाग असल्याची चर्चा आहे. दीड तास या दोन्ही नेत्यांनी बंद खोलीत चर्चा झाली. कोरे यांची हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात ताकद आहे. ते काही वर्षापासून भाजपाच्या संपर्कात आहेत. मात्र त्यांचा शाहूवाडी- पन्हाळा हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्याठिकाणी सेनेचे सत्यजित पाटील सरूडकर आमदार आहेत. त्यामुळे विधासभेला सेना हा मतदारसंघ कोरेंसाठी सोडण शक्य नसल्याने ते लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला मदत करतील का हा प्रश्न आहे. त्या दृष्टीने पाटील-कोरे भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)