बापाने जे द्यायचं आहे ते बाप देईल – चंद्रकांत पाटील 

मुंबई: विधिमंडळात आज आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलेच वातावरण तापले आहे. विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील धनगर आरक्षणाबाबत म्हणाले “टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स चा अहवाल आला असून याबाबत  कळवलं आहे. मुलगा जे करू शकतो ते करत आहे. बापाने जे द्यायचं आहे ते बाप देईल, अशे विधान केले आहे.

राज्य सरकारने मराठा समाजाला एसइबीसी प्रवर्ग तयार करून आरक्षण देण्याचे जाहीर केले आहे. सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अधिवेशनात मांडायला हवा होता. पण अधिवेशनाचा दुसरा दिवस सुरू होत असतानाही सरकारने अहवाल अधिवेशनात मांडलेला नाही. त्यामुळे या सरकारवर विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न निर्माण होत आहे. मुस्लिम आरक्षण न्यायालयाने कायम ठेवले होते तरी सरकारने रद्द केले.

-Ads-

धनगरांना पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत आरक्षण देण्याचे सरकारने जाहीर केले होते, त्याबाबत सरकारने काहीच केले नाही. या निषेधार्थ आवाज उठवत आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सर्व विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
30 :thumbsup: Thumbs up
25 :heart: Love
9 :joy: Joy
14 :heart_eyes: Awesome
12 :blush: Great
63 :cry: Sad
1062 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)